Breking News
महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज- डॉ. श्रीपाल सबनीसमहाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाणफर्ग्युसन रस्त्यावर पुस्तक विक्री दुकानातून रोकड चोरीलाअल्‍पवयीन गुन्‍हेगारी रोखण्यासाठी डिजीटल मोबाईल व्‍हॅन फिरणारपुणेकर दीपाली अमृतकर-तांदळे ठरल्या ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’पुणे पोलिसांकडून तेजवानीच्या घरांची झाडाझडतीपुणे पुस्तक महोत्सवाच्या मांडव उभारणीचे काम वेगातराज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाईशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरीला

ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरीला

चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बालेवाडी भागातील एका ओैषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ६८ हजार रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ओैषध विक्रेत्याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बनावट कागदपत्रे सादर करुन शस्त्र परवाना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बालेवाडी भागात राहायला आहेत. बालेवाडीतील ममता चौकात त्यांचे मेडीकेअर केमिस्ट हे ओैषध विक्री दुकान आहे. सोमवारी (२ डिसेंबर) रात्री अकराच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ला उचकटून चोरट्यांनी ६८ हजार ३०० रुपयांची रोकड लांबविली. बुधवारी (३ डिसेंबर) सकाळी ओैषध विक्रेता दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा गल्ल्यातील रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस हवालदार निकाळजे तपास करत आहेत.

हडपसर भागात घरफोडी

हडपसर परिसरात एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे काळेपडळ परिसरातील शिवराय काॅलनीत राहायला आहेत. बुधवारी (३ डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास तक्रारदार आणि कुटुंबीय कामानिमित्त बाहेर पडले.चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील एक लाख रुपयांचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. दुपारी साडेचारच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×