Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

कॅन्सर बरे झालेले रुग्ण हे आमच्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आणि हिरो – लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव

कॅन्सर बरे झालेले रुग्ण हे आमच्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आणि हिरो - लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव

केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांचा ‘दिवाळी विथ अ पर्पज’उपक्रम अंतर्गत मोफत उपचार

marathinews24.com

पुणे – कॅन्सर बरे झालेले रुग्ण हे आमच्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर आणि हिरो आहे. ते आगामी काळात इतर रुग्णांना प्रेरणा देऊन धैर्य देत रहातील. केअर इंडिया मेडिकल सोसायटी समाजात एक महत्त्वपूर्ण काम करत असून त्यांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी रुग्णांवर केवळ उपचार केले जात नाही तर सेवाभाव पद्धतीने मोफत काम केले जात आहे. माझ्या निवृत्तीनंतर या सोसायटी सोबत काम करण्यासाठी मी उत्सुक असेल.एएफएमसी मध्ये कॅन्सर तपासणीबाबत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे असे मत एएफएमसीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव यांनी व्यक्त केले.

मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही.. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – सविस्तर बातमी  

केअर इंडिया मेडिकल सोसायटी तर्फे कर्कग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करणारा ‘दिवाळी विथ अ पर्पज’ हा सामाजिक उपक्रम मागील 30 वर्षांपासून राबविण्यात येतो. गुरुवारी या उपक्रम अंतर्गत कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे आप्तसंबंधी यांच्या उपस्थितीत चरक ऑडिटोरियम कमांड हॉस्पिटल (दक्षिण मुख्यालय), पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लेफ्टनंट जनरल पंकज पी. राव (संचालक व कमांडंट, एएफएमसी, पुणे), लेफ्टनंट जनरल ( निवृत्त) एम. ए. टुटकणे ( माजी कमांडंट, एएफएमसी, पुणे),मेजर जनरल बी. नाम्बियार (कमांडंट, कमांड हॉस्पिटल, पुणे – एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम), विकास छाब्रा (एरिया व्हाइस प्रेसिडेंट व डायरेक्टर, बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया),कर्नल (नि)डॉ. एन. एस. न्यायापथी, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरीच्या वत्सला स्वामी, तसनीम शेख व्यासपीठावर उपस्थित होते.

लेफ्टनंट जनरल ( निवृत्त) एम.ए.टुटकणे म्हणाले,कोणत्या अडचणी मधील व्यक्तीला दिलासा देऊन हसवणे आयुष्यात महत्वाचे काम आहे. डॉ.न्यायापथी यांनी जी टीम बनवली आहे ती पडद्यामागे राहून रुग्ण बरे होण्यासाठी उल्लेखनीय काम करत आहे. अनेक डोनर यांच्यामुळे हे काम पुढे जात आहे, त्यामुळे प्रत्येकाने याकामी आपले योगदान द्यावे. कॅन्सर हा नियंत्रित राहू शकतो याबाबत जागरूकता अधिक प्रमाणात निर्माण झाली पाहिजे.

मेजर जनरल बी. नाम्बियार यांनी सांगितले की, डॉ. न्यायपथी हे तन्मयतेने अनेक वर्षापासून भवानी पेठ येथे “विश्रांती रुग्णालयात” कॅन्सर रुग्णांवर उपचार करत आहे. त्याठिकाणी भेट देऊन अधिक माहिती करून घेण्याची मला देखील उत्सुकता आहे.

विकास छाब्रा म्हणाले, विश्रांती रुग्णालयात रुग्णांना सेवाभाव चांगल्याप्रकारे मिळत आहे. माझ्या मुलीस मी याठिकाणी सेवाभाव शिकण्यासाठी पाठवले आणि तिला वेगळ्याप्रकारे अनुभव जीवनात मिळाला. सामुदायिक जबाबदारी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे त्याबाबत सर्वांनी एकत्रित प्रयत्न समाजात करणे आवश्यक आहे. कॅन्सरशी लढा योग्यप्रकारे दिल्यास त्यावर मात करणे शक्य आहे.

कमांड हॉस्पिटलचे मेजर जनरल अतुल सेठ म्हणाले, सन 2008 मध्ये मी पुण्यात नियुक्तीवर आलो आणि मला रुग्णांच्या माध्यमातून डॉ.एन. एस. न्यायापथी यांच्या कामाबद्दल माहिती झाली. हॉस्पिटल आणि त्यांचे नाते एकरूप झाले आहे. “विश्रांती ” हे हॉस्पिटल पेक्षा ते रुग्णांच्या दृष्टीने एखाद्या तीर्थस्थाना सारखे आहे. कारण त्याठिकाणी अनेक रुग्ण कॅन्सर पीडित असून त्यांच्यावर आनंदाने विनामूल्य औषधउपचार सुरू आहे. एएफएमसी मधील नवीन डॉक्टर यांना देखील संबंधित काम कशाप्रकारे चालते हे पाहण्यासाठी आता पाठवले जाणार आहे.

उपक्रमाबद्दल संस्थेच्या संचालिका तसनीम शेख यांनी सांगितले की, केअर इंडिया मेडिकल सोसायटीची स्थापना 1993 साली झाली.1995 पासून दरवर्षी दिवाळी निमित्त ‘दिवाळी विथ अ पर्पज’ हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे.केअर इंडिया मेडिकल सोसायटी तर्फे ‘सुरुवातीच्या काळात, जे कॅन्सर रुग्ण शेवटच्या टप्यात आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांचा त्रास कमी व्हावा असे उपचार त्यांच्यावर केले जात. कालानुरूप गरजेनुसार रुग्णांच्या मागणीनुसार केमोथेरपी विश्रांती रुग्णालयात सुरू करण्यात आले. रेडियशन आणि अन्य उपचारांसाठी रुग्णांना अन्य रुग्णालयात पाठवविण्यात येते मात्र, त्यांचा संपूर्ण खर्च केअर इंडिया मेडिकल सोसायटी उचलते.

केअर इंडिया मेडिकल सोसायटी दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना प्रोत्साहन देत समाजात सकारात्मकता आणि संवेदनशीलतेचा संदेश पोहोचवते. ‘दिवाळी विथ अ पर्पज’ हा यावर्षीचा स्नेहसोहळा नेहमीप्रमाणेच रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचा आणि आनंदाचा प्रकाश फुलविणारा ठरला असे मत डॉ. डॉ. एन. एस. न्यायापथी यांनी व्यक्त केले.

उपचाराने आमचा पुनर्जन्म झाला

रुग्ण रेश्मा जाधव अनुभव सांगताना म्हणाल्या, माझे उपचार रुग्णालयात मोफत करण्यात आले आणि वैयक्तिक लक्ष्य दिले गेले. केमोथेरपी शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळ पुरेसे पैसे नसल्याने मी जगेल की नाही याची शाश्वती नव्हती. परंतु केअर इंडिया मेडिकल सोसायटी मार्फत योग्य आणि वेळेत उपचार मिळून मी बरी झाली आहे. घरी गेल्यानंतर देखील वेळोवेळी घरी येऊन तपासणी होऊन मोफत औषध दिले जात आहे. जगण्याची नवी प्रेरणा आता आम्हाला मिळाली आहे.आमचा पुनर्जन्म झाला आहे. वेळेवर औषध आणि उपचार रुग्णालयात करण्यात आले आहे त्यामुळे त्यांचे ऋण फेडू शकत नाही. याप्रसंगी विविध बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आयेशा शेख यांनी केले तर आभार वत्सला स्वामी यांनी मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×