Breking News
फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यूपुण्यात आजपर्यंतच्या एन्काऊंटरमध्ये ३३ गुंडांचा खात्मासोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय

चंदननगरमध्ये वसाहतीत आग; तब्बल ५० झोपड्या जळाल्या

१०० गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढले, मोठा अनर्थ टळला

marathinews24.com

पुणे – शहरातील चंदननगर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत बुधवारी पहाटे आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रहिवासी बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर १० गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घबराट उडाली. आगीत ५० पेक्षा जास्त झोपड्या जळाल्या असल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली. वसाहतीतील रस्त्यावर लावलेल्या चार ते पाच दुचाकीही जळाल्या.
चंदननगर भागात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत आहे. या वसाहतीत कष्टकरी मोठ्या संख्येने राहायला आहेत. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास वसाहतीतील झोपड्यांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षाला मिळाली.

दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सज्जाद गुल – सविस्तर बातमी

आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १५ बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर वसाहतीतील नागरिक बाहेर पळाल्याने गंभीर दुर्घटना टळली. झोपड्यांमधील १० गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली. स्फोटाच्या आवााजमुळे घबराट उडाली.


अग्निशमन दलाचे केंदप्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीत झोपड्यांमधील गृहोपयोगी वस्तू जळाल्या. डोळ्यादेखत संसार जळाल्याने अनेकांना दु:ख अनावर झाले.
जवानांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले असून, आगीत कोणी जखमी झाले नाही. जवानांनी झोपड्यांमधून १०० पेक्षा जास्त सिलिंडर बाहेर काढले. सिलिंडर बाहेर काढल्याने गंभीर दुर्घटना टळली, असे अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पाेटफोडे यांनी सांगितले.

शिवाजी रस्त्यावरील लाकडी वाड्याला आग

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराशेजारी असलेल्या जुन्या लाकडी वाड्याला मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. लाकडी वाडा पेटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या काका हलवाई मिठाईच्या दुकानातून जवानांनी प्रवेश करून इमारतीतून पाण्याचा मारा केला. लाकडी वाड्याच्या तळमजल्यावर दोन दुकानांनी आगीच झळ पाेहोचली.
जुन्या वाड्यातील आठ ते दहा रहिवासी आग लागल्यानंतर बाहेर पडल्याने बचावले. ५० जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत केला हाेता. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top