Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत

महिलेचे दागिने हिसकावणारा चोरटा गजाआड

सीबीआयकडून कारवाई

marathinews24.com

पुणे – देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात पुण्यातील जीवशास्त्राच्या प्राध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केली. मांढरे ही परीक्षा प्रक्रियेशी (एनटीए) संबंधित आहे. पेपरफुटी प्रकरणात ती सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने दिली.
मनीषा मांढरे ही वरिष्ठ प्राध्यापिका आहे. ती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. याप्रकरणात तिची दिल्लीत चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतीशास्त्र, तसेच प्राणीशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्युटीपार्लर चालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक केली होती.

फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी नवी मुंबईतून अटकेत – सविस्तर बातमी

वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या घरी बोलविले होते. तेथे प्रा. मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती तिने दिली होती. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर प्रा. मांढरेला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून शुक्रवारी अटक केली. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कुलकर्णीची सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. चौकशीत मांढरे ही या प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिला सीबीआयने अटक केली. नीट’ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथून धनंजय लोखंडे (वय २६) याला ताब्यात घेतले. लोखंडे हा पुण्यातील काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी परिसरात ब्यूटी पार्लर चालविणारी मनीषा वाघमारे आणि अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला पुणे पोलिसांनी बुधवारी (१३ मे) ताब्यात घेतले. धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे हिला अटक केली.

जयपूरमधील तीन, गुरुग्राममधील एक आणि नाशिकमधील एका आरोपीचा समावेश आहे. सीबीआयने देशातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकले. कागदपत्रे, मोबाइल संच, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. जयपूर, ग्रुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यातून प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुलकर्णी, वाघमारे यांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून त्यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी मनीषा वाघमारे ही ब्युटीपार्लर चालक आहे. तिचे पती दंतवैद्यक तज्ज्ञ आहेत. तिच्या पतीचे बिबवेवाडीत रुग्णालय आहे. सीबीआयच्या पथकाने वाघमारेच्या पतीच्या रुग्णालयात जाऊन चौकशी केली. रुग्णालय बंद असल्याचे निदर्शनास आले. वाघमारेच्या डाॅक्टर पतीची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×