दोघांना अटक, वानवडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – अलिशान मोटारीतून गावठी दारू विक्री करणार्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक करणार्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हातभट्टी दारूची वाहतूक करणार्या दोघांना ताब्यात घेत तब्बल ४२० लिटर अवैध दारू जप्त केली आहे. लियाकत रोहित अब्बासी (वय ३२, रा. ढोबरेवाडी , सोपानबाग ) आणि समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे काळेशिवार, कॅनॉलजवळ, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कॉलेजच्या आर्थिक व्यवहारासाठी भावांची भांडणे – सविस्तर बातमी
वानवडी पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलिस हवालदार दया शेगर व अभिजित चव्हाण यांना हातभट्टीची दारूची मोटारीतून विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने दोघांना ताब्यात घेत गाडीतून प्रत्येकी ३५ लिटर क्षमतेचे १२ कॅन मिळून ४२० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. होळीनिमित्त गावठी दारूला मागणी वाढल्याने आरोपी लियाकतने अजय विद्यानंद हिरेकरू(रा. ढोबरवाडी, पुणे) यांच्या सांगण्यावरून समीर राठोड याच्याकडून दारू खरेदी केल्याचे चौकशीत सांगितले. गुन्ह्याचा तपास हवालदार अमोल पिलाणे करीत आहेत. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एपीआय नम्रता देसाई (वानवडी विभाग), वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील पोलिस निरीक्षक संगिता जाधव, एपीआय उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्काज शेख, महेश गाडवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णू सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, अर्पित सय्यद यांनी केली.























