Breking News
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कारकृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधनवारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यातहल्ल्याची १० महिन्यांपुर्वी तयारी, ५ आरोपी अटकेतनागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यातसिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारसमाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावीचांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांनाआंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

पुण्यात ८५० रुग्णालयांना नोटीस, आपत्कालीन रुग्णांकडून डिपॉझिट न मागण्याचा आदेश

शहरातील ८५०  रुग्णालयांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस, इमर्जन्सी केसमध्ये डिपॉझिट मागू नका

Marathinews24.com

पुणे – भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचं प्रसुतीदरम्यान निधन झालं.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपये डिपॉझिट भरण्यास सांगितले.त्यावेळी भिसे कुटुंबियांकडे एवढी रक्कम भरण्यास नव्हती.त्यामुळे तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं आणि तिथे तनिषा भिसे यांची प्रसूती झाली.तनिषा भिसे यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला.पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचं काही वेळात निधन झाल्याची घटना घडली.पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून पैशांसाठी अडवणूक केली नसती,तर तनिषा भिसे यांच्यावर वेळेत उपचार झाले असते आणि त्यांचा जीव वाचला असता,असे आरोप भिसे कुटुंबियांकडून केला जात आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे.तर भिसे कुटुंबीयांना 10 लाख रुपये भरण्यास सांगणारे डॉ.सुश्रूत घैसास यांनी रुग्णालयाच्या मानद प्रसुतीपदाचा काल राजीनामा दिला आहे.

त्या सर्व घडामोडी दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील 850 रुग्णालयांना नोटिस पाठविण्यात आली आहे.इमर्जन्सी केसमध्ये संबधित रुग्णांच्या कुटुंबियांकडून डिपॉझिट घेऊ नये, उपचार दिल्यानंतर इतर गोष्टींबाबत कुटुंबियासोबत चर्चा करा,रुग्णालयात आलेल्या रुग्णांना प्राधान्याने उपचार दिले पाहिजे.जर कोणत्याही रुग्णालयाने डिपॉझिट ची मागणी केल्यास त्या रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ.सूर्यकांत देवकर यांनी माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×