Breking News
चेन स्नॅचिंग करणारे चोरटे २४ तासांत जेरबंदसहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कररुजवू मराठी, फुलवू मराठी” संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन उत्साहातमहिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलरुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळ

प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर दरोडा

चालक, वाहक, प्रवाशांना मारहाण

marathinews24.com

पुणे – बीडला निघालेल्या प्रवासी बसवर दरोडा घालून चोरट्यांनी बसचालकासह वाहक, प्रवाशांना मारहाण करून लुटल्याची घटना नगर रस्त्यावरील बकोरी फाटा परिसरात मध्यरात्री घडली. चोरटे मोटारीतून अहिल्यानगरकडे पसार झाले. याबाबत बसचालक भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. मयूर नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची २५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी बस भोसरीहून गुरुवारी रात्री बीडकडे निघाली होती. बस युवराज ट्रॅव्हल्सच्या मालकीची आहे. पुणे-नगर रस्त्यावरील बकोरी फाटा परिसरातील समृद्धी लाॅजजवळ प्रवाशांना घेण्यासाठी बस रात्री पावणेबाराच्या सुमारास थांबली. त्या वेळी चार चोरटे प्रवासी म्हणून बसमध्ये शिरले. चोरट्यांनी प्रवासी हृषीकेश सानप (वय २४, रा. बीड) यांना मारहाण करून पैशांची मागणी केली. त्यानंतर चोरट्यांनी बसचालक मिसाळ यांना धमकावले. चोरट्यांनी त्यांच्या खिशातील साडेपाच हजारांची रोकड काढून घेतली. बसवाहक संतोष ठोकळ (वय ३३, रा. बीड) यांनाही चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर चोरटे बसमधून खाली उतरले. पाठीमागून आलेली मोटार तेथे थांबली. चोरटे मोटारीतून अहिल्यानगरकडे पसार झाले. मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी बकोरी फाटा परिसरात गर्दी होती. प्रवासी वाहतूक करणारा बसचालक आणि वाहकाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×