Breking News
कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनफुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्लापंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

महापालिकेच्या कर आकारणी विभागात रिव्हाॅल्वर उगारुन धमकी

उपाहारगृह चालकाच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न

प्रकरणात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जादा कर आकारणी केल्याचा आरोप करुन महापालिकेच्या कर आकारणी विभागात रिव्हाॅल्वर उगारून आत्महत्येची धमकी देणाऱ्या एका विरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी दुपारी कर आकारणी विभागाच्या कार्यालयात ही घटना घडली. याप्रकरणी महेंद्र नरसिंग लोणकर (रा. कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या कर आकारणी विभागातील कर्मचारी गणेश दिलीप ठोंबरे (वय ३७, रा. कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गॅस पुरवठा खंडीत करण्याची दाखवली भीती – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास महापालिकेच्या कर आकारणी विभागात आला होता. जादा मिळकर कर आकारण्यात आल्याचा आरोप करुन कर आकारणी विभागाच्या कार्यालयातून उडी मारण्याची धमकी दिली. माझ्याकडे परवाना असलेले रिव्हाॅल्वर आहे, असे सांगून आरोपीने पँटच्या खिशातून रिव्हाॅल्वर काढून उगारले. रिव्हाॅल्वर उगारुन त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे ठोंबरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक वलसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×