घरफोड्यांचा धुमाकूळ
maratinews24.com
पुणे – शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच उच्छाद घातला असताना त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसून आले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून येवलेवाडी आणि मुंढव्यात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला आहे.
पुण्यात वेधशाळा चौकात मोटारीला आग – सविस्तर बातमी
घरफोड्यांनुळे पुणेकर हैराण तर झाले आहेतच, पण प्रचंड भितीच्या छायेखाली आहेत. याप्रकरणी येवलेवाडी पोलिस ठाण्यात जिजाप्पा देवकाते (वय ६३) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २ ते ६ फेब्रुवारीच्या दरम्यान घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कात्रज कोंढवा रोडवरील गोकुळनगर परिसरात विठ्टल रखुमाई मंदिरजवळ राहतात. ते २ फेब्रुवारीदरम्यान, कुटूयंबियांसोबत बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. नंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दार व आतील ड्राव्हर कटावणीने उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम असा २४ लाख ४८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेली. तक्रारदार ६ फेब्रुवारी परत आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे दिसून आले. नंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली. पोलिसांनी या भागात असलेले सीसीटीव्ही तपासले असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
मुंढवा भागातील राजश्री शाहु महाराज प्राथमिक विद्यालयाच्या शेजारील गजानन महाराज हाऊसिंग सोसायटीत घडली आहे. चोरट्यांनी ५ ते ६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच कपाटातील २२ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात श्रेणिक विनोद कासवा (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.






















