कदमवाक वस्तीनजीक अपघात
marathinews24.com
पुणे – रस्ता ओलांडणार्या तरूणाला हायवा ट्रकने चिरडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीनजीक घडला आहे. याप्रकरणी हायवा ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसाराम जोराराम चौधरी (वय २३ रा. बारणेर, राजस्थान) असे अपघातात ठार झालेल्या पादचार्याचे नाव आहे.
वादातून तरूणावर हल्ला, टोळक्याविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसाराम चौधरी हा मूळचा राजस्थानचा होता. तो कामानिमित्त कदमवाक वस्तीजवळ राहायला होता. ७ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी जात होता. पेट्रोल साठा कंपनीच्या गेटक्रमांक दोनसमोर जसाराम रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव हायवा ट्रक चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाल्यामुळे जसारामला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे तपास करीत आहेत.























