पाच जणांवर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – भरधाव गाडी चालवल्यानंतर सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस अमंलदारांनाच धक्काबुक्की करणार्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर सुंदर नटकले (वय २६), राहुल संजय साळवे (वय २३), रोहित अशोक डोंगरे (वय २७, सर्व रा. भिमनगर, विश्रांतवाडी, पुणे), सिध्दी कांबळे (वय २४, रा. साप्रस आंबेडकर सोसायटी, येरवडा) आणि हर्षल भोसले (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज बापुराव रणसिंग (वय ३२, रा. घोरपडी बाजार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० ऑगस्ट रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
शिक्रापूरमध्ये गुंडाचा एन्काऊंटर – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्कुटी व अन्य दुचाकी भरधाव वेगात चालवत असताना त्यांनी गाडी सुरजच्या गाडीसमोर उभी करून त्यांचा मार्ग आडवला. नंतर सुरज यांना हाताने मारहाण कयन त्यांची चांदीची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी छेडछाडीची तक्रार दाखल करेन अशी दमदाटी आरोपींनी केली. नंतर शिवीगाळ करून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तेथून जाणार्या अमंलदारांनी आरेापींना समजविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाच धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.






















