Breking News
शेतात कापूस वेचणाऱ्या विवाहितेचा विनयभंगमुख्यमंत्र्यांनी दावोस मधून अनुभवला भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरारपुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरारपुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडारलढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ… आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ !!!पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला बेड्यामनी लॉड्रींगच्या धमकीने महिलेला गंडाकुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्रजेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक

वारजे, खडकीत अपघातात दोघे ठार

शहरात वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बाह्यवळण मार्गावर वारजे भागात खासगी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी घडली. विश्वास पांडुरंग पडवळ (वय ५५, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ दिपक पडवळ (वय ५०, रा. कोळीवाडा, मुंबई) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पडवळ हे वारजे भागातील विनायक हॉस्पिटलसमोरील रस्ता सोमवारी सायंकाळी ओलांडत होते. त्यावेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या धडकेत पडवळ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालल्लेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे तपास करत आहेत.

नर्‍हेत पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी 

दरम्यान, पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीच्या मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पाटील इस्टेट भागात मंगळवारी घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे. श्वेता शंकर दोडमणी (वय २३, रा. देहूरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. भरधाव वेग आणि वाहन चालकांच्या चुकांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×