५ अल्पवयीन ताब्यात
marathinews24.com
पुणे – वैमनस्यातून अल्पवयीनावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी पाच अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. अल्पवयीनाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हडपसरमधील आगीमागे तरुणाचा हात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील उपाहारगृहाजवळ अल्पवयीन शनिवारी दुपारी थांबला होता. त्यावेळी पाच अल्पवयीन तेथे आले. त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. जुन्या वादातून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. पसार झालेल्या पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार अडागळे तपास करत आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी धनकवडीतील प्रियदर्शिनी शाळेच्या परिसरात अल्पवयीनावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली होती. तसेच कोंढवा भागात जुन्या वादातून अल्पवयीनाला हॉकीस्टिकने मारहाण केल्याची घटना घडली होती.
























