Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

बिल्डर अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज

बिल्डर अगरवालचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज

कल्याणीनगर अपघात प्रकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावासयिक विशाल अगरवाल याचा जामीन रद्द करण्यासाटी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मंगळवारी ( २३ जून) सुनावणी होणार आहे.

हातभट्टी दारू विक्रेत्याची थेट कारागृहात रवानगी – सविस्तर बातमी 

कल्याणीनगर अपघात प्रकरणात न्यायालयाकडून अगरवाल याला जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर समाज माध्यमात अगरवाल आणि कुटुंबीय जल्लोष करतानाची कथित चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या घटनेची दखल घेऊन अगरवाल याचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी राज्याच्या विधी विभागाची परवानगी मिळविण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी शनिवारी (२० जून) अर्ज दाखल केला.

कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली होती. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अगरवाल याच्या अल्पवयीन मुलासह मित्रांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अगरवाल आणि साथीदारांनी ससूनमधील डाॅक्टरांशी संगनमत केले होते. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर विशाल अगरवाल याला अटक करण्यात आली होती. त्याचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर अगरवालने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालायने कठोर अटी, शर्तींवर अगरवालचा जामीन मंजूर केला होता. जामीन मिळाल्यानंतर अगरवाल याची कुटुंबीयांसोबत जल्लोष करताना कथित चित्रफीत प्रसारित झाली होती. समाज माध्यमात ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले होते. जबाब आणि डिजिटल पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने अगरवाल याला घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्याचे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे. अगरवाल याला जामीन मिळाल्यानंतर जल्लोष करताना कथित चित्रफीत प्रसारित झाली. अशा कृत्यामुळे साक्षीदारांवर दबाब येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. या अर्जावर मंगळवारी (२३ जून) न्यायालयात सुनावणी होणार आहे. अगरवाल याला याबाबत ‘म्हणणे’ मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

– शिशिर हिरे, विशेष सरकारी वकील

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×