Breking News
रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला; जुन्या वादातून मारहाणपुण्यात एकाच दिवसांत दोन खूनाच्या घटनांनी खळबळविशेष वृत्त – साथी पोर्टल: बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता व विश्वासार्हतेकडे डिजिटल पाऊलदुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूबंगल्यातून २७ लाखांचे दागिने लंपास‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील शिवराज मोटेगावकर यांची चौकशी‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला ‘सीबीआय’ कोठडीदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जापैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकलेपुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिक प्रात्यक्षिके कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांना अर्ज करा

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफुल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

महिला सशक्तीकरणासाठी गुलाबी ई-रिक्षा खरेदी योजना – सविस्तर बातमी

३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार असून सहभागी होण्यासाठी गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

अर्जासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर “बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट सदस्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. विविध पिकांच्या पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×