Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

कलाकारांनी कायम शिकत राहणे आवश्यक – दिग्दर्शक मधुर भांडारकर

अभिनय कार्यशाळा व फिल्म इंडस्ट्री समिट २०२६ उत्साहात

marathinews24.com

पुणे – दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे आयोजित करण्यात आलेली “अभिनय कार्यशाळा व फिल्म इंडस्ट्री समिट – २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. राज्यभरातून मोठ्या संख्येने नवोदित कलाकार, अभिनयप्रेमी आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या समिटला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोककलावंतांची आबाळ दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा – सविस्तर बातमी

कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. यावेळी पद्मश्री आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पूसाळकर, दादासाहेब फाळके फिल्म इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कोरे,
साऊथ स्टार अभिनेता रवी प्रकाश, प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर विकी सिदाना, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते राहुल सोलापूरकर, व्हॉईस ओव्हर कलाकार केदार आठवले, सुनील महाजन, रमेश परदेशी, बाबासाहेब पाटील, राज काझी, “मामाच्या गोव्याला जावूया” चित्रपटातील कलाकार कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण आणि दिग्दर्शक विजू माने उपस्थित होते.

भांडारकर म्हणाले, “आजचा सिनेमा सतत बदलत आहे आणि प्रत्येक पाच वर्षांनी चित्रपटसृष्टीत नवे ट्रेंड येत असतात. त्यामुळे दिग्दर्शक आणि कलाकारांनी कायम शिकत राहणे आणि स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात प्रेक्षक अधिक जागरूक झाले आहेत. पूर्वी वर्तमानपत्रांवर अवलंबून असलेली माहिती आता क्षणार्धात मोबाईलवर उपलब्ध होते. प्रेक्षकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊनच आम्ही कथा आणि पात्रांवर अधिक मेहनत घेतो. मला माध्यमे, प्रेक्षक आणि चित्रपटप्रेमींनी दिलेल्या प्रेम व पाठिंब्यामुळेच माझे चित्रपट यशस्वी ठरले आहेत.”

समिटमध्ये चित्रपटसृष्टीतील संधी, अभिनयातील व्यावसायिक शिस्त, कलाकाराचा प्रवास, ऑडिशन प्रक्रिया, पोर्टफोलिओ, लूक टेस्ट, सेल्फ टेस्ट, संवादकौशल्य, कॅमेऱ्यासमोरील आत्मविश्वास, चित्रपट निर्मिती प्रक्रिया, कलाकार निवड, शूटिंगचा अनुभव आणि फिल्म प्रमोशन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष ऑडिशन डेमो, सीन परफॉर्मन्स आणि सहभागी कलाकारांना तज्ज्ञांकडून थेट फीडबॅक देण्यात आला.

चित्रपट आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी हा समिट अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले. तर आभार राजाराम कोरे यांनी मानले. आजच्या तरुणांमध्ये अफाट क्षमता आहे. योग्य प्रशिक्षण, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटसृष्टीचे नाव उज्ज्वल करू शकतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×