Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

सहायक नगर रचनाकाराची २ कोटी ७८ लाखांची बेहिशेबी मालमत्ता

दाम्पत्यावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महापालिकेच्या नगररचना विभागातील सहायक नगर रचनाकार विकास किसन ढेकळे (वय ५०) यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपयांची (१८.४७%) बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विकास ढेकळे यांच्यासह त्यांच्या पत्नी भाग्यश्री विकास ढेकळे यांच्याविरुद्ध याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १३(१)(ई), १३(२) तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात मद्यधुंद तरुणांची ‘गाडीत’ हुल्लडबाजी – सविस्तर बातमी 

पुणे महापालिकेच्या नगररचना विभागात विकास ढेकळे हे सहायक नगर रचनाकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध १९ जून २०२४ रोजी महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई मुख्यालयाकडून उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्या मालमत्ता आणि उत्पन्नाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान १७ ऑगस्ट १९९९ ते २० मार्च २०२५ या कालावधीतील ढेकळे यांच्या मालमत्ता, उत्पन्न आणि खर्चाची तपासणी करण्यात आली. त्यात कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अतिरिक्त मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले.

ढेकळे यांनी त्यांच्या वैध उत्पन्नापेक्षा २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपये अधिकची मालमत्ता भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे तपासात दिसून आल्याचे चौकशीनंतर समोर आले. बेहिशेबी मालमत्तेबाबत पत्नी भाग्यश्री विकास ढेकळे यांनीही पतीला मदत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. विशेष म्हणजे चौकशीदरम्यान बनावट कागदपत्रे सादर केल्याचेही एसीबीने नमूद केले आहे. ढेकळे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे प्रमाण त्यांच्या एकूण कायदेशीर उत्पन्नाच्या १८.४७ टक्के असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणाची पोलिस उपअधीक्षक मनीषा झेंडे यांच्याकडून उघड चौकशी करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×