Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्न

पोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्न

नवले पूल परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करून मोटार चालक व्यावसायिकाकडील १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शनिवारी ( दि.१८) बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ घडली. याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिकाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय व्यावसायिक तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहेत. शनिवारी (१८ जुलै) दुपारी एकच्या सुमारास ते सिंहगड रस्त्यावर आले होते. तेथून ते मोटारीतून नऱ्हे भागातील बँकेत निघाले होते. त्यांच्याबरोबर मोटार चालक आणि एक जण मोटारीत होते. मोटारीतून ते मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गाकडे निघाले होते. नवले पुलाजवळ वेगवेगळ्या दुचाकीवरुन आलेल्या ५ चोरट्यांनी मोटार अडवली. चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची चौकशी सुरू केली. मोटारीतून बेकायदा कामातून मिळालेल्या मोठी रक्कम नेण्यात येत आहे, असे सांगून चोरट्यांनी व्यावासायिकाकडील १ कोटी रुपयांची रोकड असलेले पिशवी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.

व्यावसायिकाने आरडाओरडा केला. चोरट्यांना विरोध केल्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नऱ्हे पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी नवले पूल परिससरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असूपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नन, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×