२१ किलो गांजा जप्त
marathinews24.com
पुणे – दुचाकीवर प्रवास करीत गांजा विक्रीचा प्रयत्न करणार्या तस्कराला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केली आहे. त्याच्याकडून २१ किलो २०० ग्रॅम असा ११ लाख ४५ हजारांचा गांजा जप्त केला आहे. पोपट मारुती पाडुळे (वय ५६, रा. नवीन म्हाडा कॉलनी ) याला अटक केली. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘ज्ञान माऊली’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर – सविस्तर बातमी
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने युनीट सहाचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार पल्लवी मोरे, बाळासाहेब सकटे यांना गांजा तस्कराची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अल्पवयीन सह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ किलो २०० ग्रॅम गांजा, दुचाकी असा ऐवज जप्त केला.ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक संतोष शेटे, एपीआय संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव, ज्ञानेश्वर शिर्वेâ, तानाजी देशमुख, समीर पांडुळे, अमित कांबळे, गणेश माने यांनी केली.





















