Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घ्यावा

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घ्यावा

समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंचना कोचुरे यांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारित्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) जमीन अथवा दोन एकर बागायती (ओलीताखालील) जमीन उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंचना कोचुरे यांनी केले आहे.

आजपासून वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! – सविस्तर बातमी 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी कमाल आर्थिक मर्यादा निश्चित करण्यात आली असून, जिरायती जमिनीसाठी प्रति एकर रु. ५ लाख तसेच बागायती जमिनीसाठी प्रति एकर रु. ८ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात येते. योजनेअंतर्गत नमूद दरानुसार जमीन विक्री करण्यास इच्छुक असलेल्या जमीन मालकांनी आवश्यक अटी व शर्तीची पूर्तता करुन आपल्या जमीन विक्रीबाबतचे प्रस्ताव सादर सादर करावेत.

बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व उपसाधने पुरवठा

समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्याच्या योजनेअंतर्गत बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या उद्देशाने ९० टक्के शासकीय अनुदानावर (कमाल रु. ३ लाख १५ हजार रुपये) मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येतो.

या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदीसाठी कमाल खर्च मर्यादा रु. ३ लाख ५० हजार निश्चित करण्यात आली आहे. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचत गटाने एकूण खर्चाच्या १० टक्के म्हणजेच रु. ३५ हजार इतका स्वहिस्सा भरल्यानंतर योजनेचा लाभ घेता येणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे कोचुरे यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×