Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पुण्यात पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफीसला बॉम्बस्फोटाची धमकी

पुण्यात पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफीसला बॉम्बस्फोटाची धमकी

धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस, बीडीडीएसची धाव

marathinews24.com

पुणे – शहरातील पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयासह पुण्यातील स्टेशन परिसरातील जीपीओ पोस्‍ट ऑफीसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने बुधवारी सकाळी एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पुणे पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच अन्य सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार्यालयाची कसून तपासणी केली. मात्र, प्राथमिक पाहणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सिंहगडावर वादग्रस्त फलक वनविभागाने फलक हटविला – सविस्तर बातमी 

संबंधित ई-मेलमध्ये प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि पोस्‍ट ऑफीस लक्ष्य करण्याची धमकी इंग्रजीत देण्यात आली होती. या ई-मेलमध्ये काही मजकूर तमिळ भाषेतही लिहिलेला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली असून ई-मेलचा उगम आणि त्यामागील हेतू शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. धमकीची माहिती मिळाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने कार्यालयातील प्रत्येक मजला, प्रवेशद्वार, पार्किंग परिसर तसेच इमारतीतील सर्व संवेदनशील ठिकाणांची बारकाईने तपासणी केली. कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही धोकादायक वस्तू आढळून न आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

पासपोर्टसाठी आलेल्या नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेत प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवून सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवल्या. कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजनाही करण्यात आल्या. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, धमकीचा ई-मेल मिळताच सर्व सुरक्षा प्रक्रिया तातडीने राबविण्यात आल्या. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी समन्वयाने कारवाई केली. प्राथमिक तपासणीत कोणताही धोका आढळून आला नसला, तरी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणात सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली असून ई-मेल नेमका कुठून पाठविण्यात आला, तो बनावट होता की त्यामागे कोणते मोठे षड्यंत्र आहे, याचा शोध घेतला जात आहे. संबंधित तांत्रिक माहितीच्या आधारे धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या पासपोर्ट कार्यालयातील सर्व सेवा पूर्ववत सुरू असून नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाषाण येथील पासपोर्ट कार्यालयला धकमीचा ईमेला आलेला असताना स्‍टेशन परिसरातील जीपीओ पोस्‍ट ऑफीसलाही त्‍याच ईमेलमध्ये धमकीचा उल्‍लेख होता. दोन्‍ही ठिकाणी बॉम्‍ब शोधक नाशक पथकाने केलेल्‍या तपासणीत प्रत्‍यक्षात काहीही आढळून आले नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×