Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

लोकमान्यनगरमध्ये घरफोडी; १२ लाखांचा ऐवज चोरीला

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ११ लाख ८९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना नवी पेठेतील लोकमान्यनगरमध्ये घडली.
याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायासाठी घुले कुटुंबियांचे शोले स्टाईल आंदोलन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय हे लोकमान्यनगरमधील इमारत क्रमांक नऊमध्ये राहायला आहेत. चोरट्यांनी ३० जून रोजी मध्यरात्री बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी ११ लाख ८९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. बुधवारी (१ जुलै) सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी लोकमान्यनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहे. गजबजलेल्या लोकमान्यनगरमध्ये घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रहिवाशांमध्ये घबराट उडाली. सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.

अप्पा बळवंत चौकात एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न
अप्पा बळवंत चौकातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम केंद्रात शिरलेल्या चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अप्पा बळवंत चौकात राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम आहे. बुधवारी (१ जुलै) पहाटे एटीएममध्ये शिरले. चोरट्यांनी एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार खरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×