Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पाषाण भागात घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज चोरी

पाषाण भागात घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज चोरी

फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी मारला डल्ला

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील अडीच लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना पाषाण-सुस रस्त्यावर घडली. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांकडून तरुणीची ७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय हे पाषाण-सूस रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. २५ जून रोजी चोरट्यांनी सायंकाळी सदनिकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तरुणाने तक्रार दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे तपास करत आहेत.

मिठाई विक्री दुकानातून रोकड चोरली

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील मिठाई विक्री दुकानातून चोरट्यांनी २५ हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत मिठाई विक्रेत्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात विजय स्वीट मार्ट हे मिठाई विक्री दुकान आहे. चोरट्यांनी मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील २५ हजारांची रोकड आणि मोबाइल चोरुन चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×