Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

वेल्ह्यातील पाबे घाटात बस दरीत कोसळली

मुंबईतील पर्यटक तरुणीसह दोघांचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांची बस पाबे घाटातील दरीत कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अपघातात पर्यटक तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील पर्यटक जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्वास बाबुराव सातिम (वय २५), ध्वनी चंद्रेश ठक्कर (वय २३) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. विश्वास आणि ध्वनी हे मुंबईतील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. दोघे मूळचे मुंबईतील आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष; ज्येष्ठाची १ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका खासगी कंपनीतील २२ जण खासगी बसमधून राजगड किल्ला पाहण्यासाठी निघाले होते. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वेल्हे तालुक्यातील पाबे घाटातील तीव्र वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटले. बस घाटातील संरक्षक कठड्यावर आदळली. संरक्षक कठडा तोडून बस उलटून दरीत कोसळली. बस दरीतील झाडावर अडकली. या अपघाताची माहिती मिळताच वेल्हे पाेलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पथकाने मदतकार्य सुरू केले.

वेल्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, पोलीस कर्मचारी नीलेश राणे, आकाश पाटील, पंकज माेघे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, कृष्णा मरगळे यांनी मदतकार्य करुन बसमध्ये अडकलेल्या जखमींना दरीतून बाहेर काढले. पाबे घाटातील दरीत बस कोसळल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. अंधार असल्याने मदतकार्यात अडथळे आले. झाडात अडकलेल्या बसखाली चालक अडकला. बसमधील डिझेल सांडले होते. त्यामुळे आग लागण्याची शक्यता होती. प्रतिकुल परिस्थितीत मदतकार्य करुन बसमधील पर्यटक, चालकाला दरीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान विश्वास आणि ध्वनी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. दरीत अडकलेली बस जेसीबी यंत्राच्या मदतीने बाहेर काढण्यात आली, अशी माहिती वेल्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×