Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्राचार्यांना धमकावून घोषणाबाजी केल्याचा आरोप

marathinews24.com

पुणे – शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात बेकायदेशिररित्या प्रवेश करून घोषणाबाजी, दमदाटी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार बीएनएस ३२९ (३), १८९ (५), ४६, २२१, ३५१ (२) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मनसेच्या आंदोलनानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यानी कंत्राटदाराला झापले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयातील अपुर्‍या सोयी-सुविधांमुळे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात जाउन प्राचार्यांना विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी महाविद्यालयात येताना प्रवेश घेतला नाही. विनापरवाना बेकायदेशीररित्या जमवून, प्राचार्यांच्या कार्यालयात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेतला. तक्रारदार पाटील यांना धमकावून कार्यकर्त्यांनी परिसरात जोरजोरात घोषणा देउन गोंधळ घातला. त्यामुळे तक्रारदार पाटील यांनी संबंधिताविरूद्ध चतुःशृगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

शासकीय महाविद्यालयात बेकायदेशीररित्या प्रवेश करुन घोषणाबाजी करणे, दमदाटी केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह इतर २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

चिलुमूला रजनीकांत, पोलीस उपायुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×