Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

डाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हा

गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष; ३५ लाखांची फसवणूक

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – खासगी रुग्णालयात अल्पवयीन मुलींचे बेकायदा गर्भपात करण्यात येत असल्याचा आरोप करुन एका डाॅक्टरांकडे तोतया पत्रकारांनी १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया पत्रकारांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्रणव उर्फ प्रसाद बोरसे (वय २५), शुभम सौदागर (वय २६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका डाॅक्टरांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६१ वर्षीय डाॅक्टरांचा विश्रांतवाडी परिसरात खासगी दवाखाना आहे. आरोपी त्यांच्या दवाखान्यात गेले. ‘डाॅक्टर आणि त्यांच्या पत्नीकडून दवाखान्यात अल्पवयीन मुलींचे गर्भपात केले जातात’, असा आरोप दोघा आरोपींनी केला. ‘याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध करु, अशी धमकी दिली. वृत्त प्रसारित झाल्यास दवाखाना बंद पडेल. या प्रकरणात तुम्हाला अटक होईल. बातमी प्रसिद्ध न करण्यासाठी दहा लाख रुपये द्यावे लागतील’, अशी धमकी दोघा आरोपींनी डाॅक्टरांना दिली. घाबरलेल्या डाॅक्टरांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×