Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू

कौटुंबिक छळ अन जादूटोण्यामुळे व्यावसायिकाची आत्महत्या

लोणी काळभोर परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहम लखन कसबे (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याबाबत सोहमची आई शिल्पा (वय २३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभाेरमधील कदमवाक वस्ती परिसरात सांडपाणी, तसेच पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी ठेकेदाराने खड्डा खोदला होता. हे काम ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे. मंगळवारी (३० जून) सकाळी दहाच्या सुमारास घरासमोर खेळणारा सोहम हा खड्डयात साचलेल्या पाण्यात पडला. सोहम घरासमोर न दिसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. तेव्हा तो खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याची फिर्याद सोहमची आई शिल्पा यांनी दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×