Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुण्यात CNG दरात 2 रुपयांची वाढ; आता प्रतिकिलो 97.75 रुपये

पुण्यात CNG दरात 2 रुपयांची वाढ; आता प्रतिकिलो 97.75 रुपये

पश्चिम आशियातील तणावामुळे LNGच्या किमती वाढल्या; १ सप्टेंबरपासून नवीन दर लागू

marathinews24.com

पुणे – पश्चिम आशियातील वाढलेला तणाव आणि त्याचा परिणाम म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून LNG (द्रवीभूत नैसर्गिक वायू) वाहतुकीत आलेल्या अडथळ्यामुळे जागतिक पातळीवर स्पॉट LNGच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव व हिंजवडी परिसरातील वाहनांसाठीच्या CNGच्या दरात प्रतिकिलो 2 केवळ रुपयांची वाढ जाहीर केली आहे.

कर्नाटकातील कणकगिरीत थोरले संभाजी महाराजांच्या समाधीवर ४०० किलोची पंचधातूची मेघडंबरी – सविस्तर बातमी 

नवीन दरानुसार CNGचा किरकोळ विक्री दर 97.75 रुपये प्रतिकिलो इतका होणार असून, हा दर 31 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 1 सप्टेंबर 2026 पासून लागू झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियातील संकट पुन्हा तीव्र झाले असून, जुलै 2026 पासून त्याचा LNGच्या जागतिक पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा जागतिक ऊर्जा व्यापारातील महत्त्वाचा मार्ग असल्याने तेथून LNG वाहतुकीवर परिणाम झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील LNGच्या किमती संकटापूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्या आहेत. त्यातच आगामी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर युरोपमध्ये नैसर्गिक वायूचा साठा वाढविण्याची लगबग सुरू असल्याने जागतिक LNG बाजारावरील दबाव आणखी वाढला आहे.

भारतामध्येही अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसोबत CNGची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी CNGसाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूचा मोठा हिस्सा आयात केलेल्या स्पॉट LNGमधून मिळवावा लागत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेले दर आणि स्पॉट LNGवरील वाढते अवलंबित्व यामुळे CNGच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या गॅसच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

या वाढत्या खर्चाचा पूर्ण भार ग्राहकांवर न टाकता MNGLने अतिरिक्त खर्चाचा मोठा हिस्सा स्वतःकडे घेतला असून, त्यातील केवळ काही भाग ग्राहकांवर टाकण्यात आला आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्याची दरवाढ मर्यादित ठेवण्यात आल्याचे MNGLकडून सांगण्यात आले.

दरवाढीनंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत CNGमधून वाहनधारकांना आर्थिक बचत मिळत राहणार आहे. पुणे शहरातील सध्याच्या इंधन दरांचा विचार करता, प्रवासी कारसाठी CNGमुळे पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 45 टक्के, तर डिझेलच्या तुलनेत सुमारे 23 टक्के बचत होत आहे. ऑटोरिक्षांसाठी ही बचत सुमारे 25 टक्के असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

दरम्यान, घरगुती वापराच्या PNGच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. PNGचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील CNG ग्राहकांनी नवीन दराची नोंद घ्यावी, असे आवाहन MNGLने केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×