Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ६ कोटी २५ लाखांची फसवणूक

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची १३ लाखांची फसवणूक

संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील नागरिकांना सायबर चोरट्यांनी वेठीस धरले असून, विविध प्रकारच्या धमक्या आमिष दाखवून ऑनलाइन लूट केली जात आहे. पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये ६ कोटी २५ लाख ३७ हजार ७३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ब्युटी पार्लरमधील महिलेकडून अंगठी चोरीला – सविस्तर बातमी 

विमाननगर परिसरातील ४२ वर्षीय तक्रारदाराला सायबर चोरांनी १५ ऑक्टोबर ते १६ डिसेंबर २०२५ या काल वाधीत संपर्क करत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत जास्त नफा मिळेल असे आश्वासन दिले. आमिषाला बळी पडत तक्रारदाराने ५७ लाख ७० हजार रुपये सायबर चोरांनी दिलेल्या बँक खात्यावर वर्ग केले. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या करत आहेत. तर धायरीगाव येथील ४१ वर्षीय तक्रारदाराचे १ डिसेंबर २०२५ रोजी कोणत्याही फोन, मेसेज, लिंक, इंटरनेटशिवाय थेट बँक खात्यातून ३ लाख ४५ हजार १५४ रुपये डेबिट झाले. याप्रकरणी सायबर चोरांविरोधात नांदेडसिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस हे करत आहेत.

कोथरूड परिसरातील २८ वर्षीय तरुणीची सायबर चोरांनी १० ते २० एप्रिल २०२६ दरम्यान ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगत, क्रेडिट कार्ड बंद होईल अशी बतावणी करत ३ लाख ४४ हजार ७४८ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गोखलेनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेची एनजीपीआय कंपनीतर्फे गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत अवतारसिंग, रेड्डी, देसाई, वेनुगोपाल, संजीव शर्मा एफ.आर. सर्व्हिसेस तर्फे रेना शर्मा, अजय कुमार, चंद्र प्रकाश, मदन प्रकाश आणि सुशिल नामक व्यक्तींनी २०१८ ते २०२५ या सात वर्षांत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडत ५ कोटी २१ लाख ३७ हजार १७१ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक उत्कर्षा देशमुख करत आहेत.

धायरी येथील ४५ वर्षीय तक्रारदाराची १ जानेवारी २०२१ ते २०२५ या कालावधीत गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देतो, असे आमिष दाखवत एकाने ४० लाख रुपयांची फसवणूक केली.याप्रकरणी योगेश अंबादास देशपांडे (वय ४६, रा. श्रद्धासुनिता कॉलनी को. ऑ. सोसायटी, बांबू गल्ली, येरवडा) याच्याविरोधात चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आरोपी देशपांडे याने फिर्यादी यांना धमकी दिल्याचे देखील म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील या करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×