Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणी

पुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणी

७ जणांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील सदाशिव पेठ परिसरात हॉटेलच्या केटरिंगचे कंत्राट टिकवून ठेवण्याच्या बदल्यात व्यावसायिकाला धमकावून साडे सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश खाशाबा नलावडे (वय ५३ , रा. कोथरूड, पुणे), उमाकांत रामचंद्र वालगुडे (वय ५६ , रा. कात्रज, पुणे), दिपक केशवराव धुमाळ (वय ६५ , रा. कोथरूड, पुणे), गणेश रत्नाकर भोज (वय ५३, रा. भिमपुरा कॅम्प, पुणे), दिनेश अरुण खोडके (वय ४९, रा. कोथरूड, पुणे), राजन शंकर कामठे (वय ५८ वर्षे, रा. फुरसुंगी, पुणे) आणि नितीन हरिभाऊ वाघमारे (वय ५२, रा. मंगळवार पेठ, पुणे) यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय सयाजीराव देसाई (वय ५९, रा. अशियाना अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.दि. २ एप्रिल २०२४ ते दि. १ ऑगस्ट २०२५ दरम्यान सदाशिव पेठत घटना घडली.

पुण्यात अल्पवयीनासह मित्रावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय देसाई यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तक्रारदार अजय देसाई यांनी २०१८ मध्ये म्हाळुंगे येथील पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एमराल्ड हॉलचे व्यवस्थापन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. पुढे २०२० पासून त्यांनी हॉल सुरू केला आणि २०२१ मध्ये करार झाला. त्यानंतर २०२२ मध्ये हा करार ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आला. देसाई यांनी स्वतःच्या खर्चातून हॉलचे नूतनीकरण, सजावट आणि विविध सुविधा उभारल्याने व्यवसायात वाढ झाली. मात्र, त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी भागीदारी, कमिशन आणि रोख रकमेची मागणी सुरू केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये वार्षिक २५ लाख रुपये आणि उत्पन्नातील हिस्सा देण्याची अट घालण्यात आली. पैसे न दिल्यास दुसऱ्या केटरर्सला काम देण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा आहे. एप्रिल २०२४ मध्ये ६० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. व्यवसाय वाचविण्यासाठी त्यांनी ५ एप्रिल, ६ एप्रिल आणि ७ जुलै २०२४ रोजी मिळून ३७.५० लाख रुपये रोख दिल्याचा दावा केला आहे. तक्रारीवरून सोसायटीच्या सात पदाधिकारी व संबंधित व्यक्तींविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×