Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

भांडणे सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

भांडणे सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की

मांजरी पोलिसांकडून एकाला अटक

marathinews24.com

पुणे – रस्त्यावर असलेली भांडणे सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना हडपसरमधील मांजरी भागात घडली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. अक्षय मोहन देशमुख (वय ३१, रा. देशमुख मळा, फुरसुंगी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिला पोलीस कर्मचाऱ्याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घरफोडीतील आंतरराज्य टोळीला अटक, ९ गुन्हे उघड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी परिसरात २९ जून रोजी पोलिसांचे पथक सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळी रस्त्यावर भांडणाचा प्रकार सुरू होता. महिला पोलीस कर्मचाऱ्याने भांडणात मध्यस्थी करुन देशमुख याला ताब्यात घेतले. भांडणे करु नका, असे सांगितले. त्यानंतर देशमुख महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी देशमुख याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे तपास करत आहेत.

वस्त्र दालनातून पावणेदोन लाखांची रोकड चोरी

वस्त्र दालनातील पावणेदोन लाख रुपयांची रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावासायिकाचे वस्त्र दालन महात्मा गांधी रस्त्यावर आहे. मंगळवारी (३० जून) पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी वस्त्र दालनातील पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. रोकड चोरीचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×