Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

परदेशी पर्यटकांचा पारंपरिक उत्सवात सहभाग

पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव

marathinews24.com

पुणे – दिशा हॉलिडेज आयोजित व पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या सहकार्याने “पुणे अष्टगणेश दर्शन महोत्सव” दिमाखदार पद्धतीने पार पडला. दिशा हॉलिडेज च्यावतीने युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, मॅदागास्कर, चिली व मलावी येथील पर्यटकांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिला पर्यटकांनी साडी व फेटा तर पुरुषांनी फेटा परिधान करून उत्सवात सहभागी होत पुण्याच्या संस्कृतीत रंगून गेले होते.

राज्यातील सर्व तालुक्यासह गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

पर्यटकांनी गुरुजींसह गणेशाची आरती म्हणत पुण्यातील आठ अष्टगणपती अखिल मंडई मंडळ, तुळशीबाग, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, केसरीवाडा, कसबा, भाऊसाहेब रंगारी व श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे दर्शन घेतले.गणेश दर्शनानंतर त्यांनी अस्सल श्रेयस हॉटेलची मराठी पुरणपोळी थाळी व उकडीचे मोदक यांचा मनमुराद आस्वाद घेतला. अविस्मरणीय अनुभवाच्या स्मरणार्थ सर्व पर्यटकांना विशेष स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.

सोहळ्यास सहाय्यक संचालक (पर्यटन विभाग) शमा पवार, तसेच अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात व दिशा टुरिझमचे मालक तुषार शिंदे, सुजाता शिंदे, यांसह मधुरा बोडस, स्नेहल हरपळे, विदुला जवंजाल, विक्रम खन्ना, विश्वास भोर, कृष्णा शिंदे, वेदांत चोरघे, वेदांग महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमामुळे पुण्याचा गणेशोत्सव जागतिक पातळीवर पोहोचविणेस निश्चितच हातभार लागला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×