Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पुण्यात महिलांचे दागिने हिसकावणार्‍या टोळीला अटक

६ महिलांना अटक, १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले

marathinews24.com

पुणे – बाजारात गर्दीचा फायदा घेउन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणार्‍या ६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोकड, १० मोबाईल असा मिळून ७ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. निशा शांतनु सिसोदिया (वय ३०) प्रिया आसिक सिसोदिया (वय ३४) पूनम प्रदीप सिसोदिया (वय २७) वर्षा कमल सिसोदिया (वय ३५), आसना रघुवीर सिसोदिया ( वय ३२) सोनिका निरोत्तम सिसोदिया (वय ३७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संबंधित महिला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील काडिया, गुलखेडी आणि आसपासच्या परिसरातील आहेत.

कोंढव्यात दोघांकडून हायड्रोपोनिक गांजा, मेफेड्रोन जप्त – सविस्तर बातमी

लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना या महिलांविषयी माहिती मिळाली. यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळावरील आणि पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी सुरू केली. तपास पथकाने आरोपींच्या संभाव्य मार्गांवर ५० किलोमीटर परिसरात १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमधील फुटेज तपासले. फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना महिलांच्या हालचालींची माहिती मिळाली. २७ ऑगस्टला पोलिसांचे एक पथक संगमवाडी पार्किंग क्रमांकमध्ये गेले होते. त्यावेळी चोरट्या महिला मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होत्या.त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

संबंधित टोळी बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करत होती. गर्दीतील धक्काबुक्कीचा फायदा घेऊन ते त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा बॅगेतील रोकड चोरत होती. चोरीनंतर, सर्व महिला वेगवेगळ्या दिशेने निघून जात, ज्यामुळे त्यांना ओळखणे कठीण होते. आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सोन्याचे दागिने, रोकड आणि १० मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मालाचे एकूण मूल्य अंदाजे ७ लाख रुपये आहे. टोळीने पुणे, पिंपरी-चिंचवड किंवा इतर शहरांमध्ये आणखी किती गुन्हे केले आहेत, याचाही पोलीस तपास करत आहेत. ही कामगिरी उपायुक्त चिलूमुला रजनीकांत, एसीपी सुनील जैतापूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, एपीआय निखील पवार, एपीआय दत्तात्रय लिगाडे,श्रीनाथ कांबळे, गणेश लोखंडे, धनश्री साबळे, वर्षा तळेकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×