हडपसरमध्ये ५ जणांना अटक
marathinews24.com
पुणे – Hadapsar Bar Assault: बारमध्ये गेलेल्या तरुणाने वस्तू मिळण्याआधी अगोदर बील देण्यास नकार दिला. त्याच रागातून संबंधित आरोपीने टोळक्याला बोलावून घेत तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर टोळक्याने दगड, वीटांनी मारहाण करुन तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना ११ ऑक्टोबरला मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास हडपसरमधील १५ नंबर चौकातील सरगम बारमध्ये घडली आहे. याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
दोघांत मध्यस्थी करणार्या तरुणाचा भोसकून खून – सविस्तर बातमी
निखील संतोष आव्हाड उर्फ बारक्या (वय १९) सचिन बरवराज कांबळे (वय २४)अमित दीपक जोगदंड (वय २०) राहूल रामचंद्र पोटगे (वय २५) ऐश्वर्य उर्फ रघु भरत कांबळे (वय १९, सर्व रा. गंगानगर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत बळीराम कदम (वय ३३ रा. वांगणी, अंबरनाथ ठाणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रशांत कदम हे मूळचे ठाण्यातील असून, ११ ऑक्टोबरला कामानिमित्त हडपसरला आले होते. रात्री पावणेएकच्या सुमारास ते मांजरी बुद्रूक परिसरातील १५ नंबर चौकात असलेल्या सरगम बारमध्ये काही वस्तू घेण्यासाठी गेले होते. Hadapsar Bar Assault त्यावेळी त्यांनी संबंधित काउंटरवर असलेल्याकडे मागणी केली. मात्र, त्याने प्रशांतकडे अगोदर बिलाची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यामुळे आरोपीने साथीदारांना बोलावून घेतले. त्यानंतर टोळक्याने प्रशांत शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात, पाठीत दगड, वीटांनी मारुन जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, हडपसर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया कोलेवाड तपास करत आहेत.




















