Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

कोंढव्यात दोघांकडून हायड्रोपोनिक गांजा, मेफेड्रोन जप्त

८ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत त्यांच्याकडून हायड्रोपोनिक गांजा, मेफेड्रोन असे ८ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. कोंढव्यातील अजमेरा पार्क सोसायटी रस्त्यावर एक जण दुचाकीवरुन अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची मााहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून अमीर अकबर शेख (वय ३६, रा. एल. के. अपार्टमेंट, अजमेरा पार्क, कोंढवा) याला पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडून ५ लाख २१ हजार रुपयांचा १२९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, रोकड, दुचाकी, इलेक्ट्राॅनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या असा ८ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बेकायदा सावकारी प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

कोंढवा भागात करण्यात आलेल्या दुसऱ्या एका कारवाईत मेफेड्रोन विक्री प्रकरणात अजीम सलीम शेख (वय ३७, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मेफेड्रोन दोन लाख ४२ हजार रुपयांचे १२ ग्रॅम मेफेड्रोन, रोकड, मोबाइल संच, इंजेक्शन सिरिज असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोंढवा परिसरात अमली पदार्थ तस्करी, तसेच विक्रीचे प्रकार आढळून आल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी’, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी केले.

पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले, संतोष चौधरी, उपनिरीक्षक महेंद्र डोके, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, सागर पवार, पोलीस कर्मचारी अमोल हिरवे, रवींद्र चिप्पा, केशव हिरवे, कानिफनाथ कारखेले, अमित सूर्यवंशी, रशीद शेख, राहुल रासगे, रिजाय पटेल यांनी ही कारवाई केली.

अल्पवयीनाच्या मदतीने गांजा विक्री उघड

पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गांजा विक्रीसाठी अल्पवयीनाची मदत घेतल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट सहाने उघडकीस आणला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, अल्पवयीना ताब्यात घेण्यात आले आहे. हडपसरमधील सुरक्षानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोपट मारुती पाडुळे (वय ५६, रा. नवीन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर) याला अटक करण्यात आली. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी वानवडी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदार पल्लवी मोरे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पथक सुरक्षानगर परिसरात रविवारी (३० ऑगस्ट)गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस हवालदार पल्लवी मोरे आणि बाळासाहेब सकटे यांना एक नवीन म्हाडा कॉलनीतील मोकळ्या जागेत दुचाकीवर थांबला असून, त्यांच्याकडे गांजा आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीत पोपट पाडुळे याने गांजा पुरविल्याचे उघडकीस आली. त्यानंतर पाडुळे याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २१ किलो १८० ग्रॅम गांजासह ११ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष शेटे, उपनिरीक्षक आशिष जाधव आणि पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×