Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

जिल्हा परिषद येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

निरोगी व सशक्त समाज निर्मितीसाठी योग महत्वाचे -डॉ. रामचंद्र हंकारे

marathinews24.com

पुणे – योग ही भारत देशाने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे; निरोगी व सशक्त समाज निर्मितीसाठी योगाचे महत्त्व समजून प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी केले.

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी – सविस्तर बातमी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्हा परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आला. यावेळी  उपायुक्त पशुसंवर्धन राजेश वासनिक, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिलिंद चिद्दरवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) डॉ. शोएब इनामदार, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी कल्पना पंडित तसेच  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. हंकारे म्हणाले, शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य संवर्धनासाठी योगा करणे गरजेचे आहे. नियमित योगा केल्याने तणाव कमी होण्यासह कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.तसेच आजारांपासून बचाव होण्यास मदत होते, असेही डॉ. हंकारे म्हणाले.

माधवी मागलेकर योग प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×