Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष; ज्येष्ठाची १ कोटींची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष; ज्येष्ठाची १ कोटींची फसवणूक

सायबर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे सेवानिवृत्त झाले आहेत. पौड फाटा परिसरातील एका सोसायटीत ते राहायला आहेत. एप्रिल महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी शेअ बाजारात विविध गुंतवणूक योजना, तसेच मिळणाऱ्या परताव्याची माहिती त्यांना दिली. चोरट्याच्या आमिषाला ते बळी पडले.

त्यानंतर चोरट्याच्या बँक खात्यात त्याने गेल्या तीन महिन्यात वेळोवेळी एक कोटी दहा लाख रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना संदेश पाठविला. परतावा जमा झाल्याचे भासविले. मात्र, प्रत्यक्षात परतावा बँक खात्यात जमा करण्यात आला नव्हता. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.

सिनिअर सिटीझन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची दहा लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे एरंडवणे भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून ओळखपत्र देण्यात येणार असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दहा लाख ३४ हजार रुपये काढून घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×