वानवडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले सात महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराइताला वानवडी पोलिसांनी अटक केली. रोहन भरत गायकवाड (वय २३, रा. गोसावी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसमधील म्हाडा काॅलनी परिसरात रोहन गायकवाड आणि साथीदारांनी शेखर भारता याच्यावर हल्ला केला होता. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी टोळी प्रमुख रोहन गायकवाड याच्यासह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. गायकवाड याच्या साथीदारांना अटक केली होती.
पुण्यात बेशिस्त कॅफेवरील कारवाईची पोलीस उपनिरीक्षकाला शिक्षा – सविस्तर बातमी
गायकवाड हा पसार झाला होता. तो उंड्रीतील कृष्णा हाॅटेलजवळ थांबल्याची माहिती वानवडी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी दीपक क्षीरसागर यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. पोलिसांनी सापळा लावून गायकवाड याला पकडले. परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, उपनिरीक्षक शेखर मोकाटे, दया शेगर, अमोल गाढवे, अमोल पिलाणे, दीपक क्षीरसागर, गोपाळ मदने, विष्णू सुतार, अमोल गायकवाड यांनी ही कारवाई केली.























