Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

मुंबईतून महागडी माेटार चोरणारा अटकेत

व्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मुंबईतून महागडी मोटार चोरून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. चोरट्याकडून ३० लाख रुपये किंमतीची मोटार जप्त करण्यात आली. अनीस अमीर शेख (वय २८, रा. भोंडवे वस्ती, रावेत, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुंबईतील आंबोली परिसरातून महागडी मोटार चोरीला गेली होती. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भांडणे सोडविणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की – सविस्तर बातमी  

पसार झालेला चोरटा पुण्यात मोटार घेऊन आला होता. तो मोटार विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक (एक) मधील पोलीस हवालदार रहीम शेख आणि पोलीस शिपाई मयूर भोकरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० लाख रुपये किंमतीचे महागडी मोटार जप्त करण्यात आली. पाेलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश सागडे, सहायक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, रणजीत फडतरे, रहीम शेख, बाबा दांगडे, सयाजी चव्हाण, अमोल आवाड, अतुल साळवे, बाला रफी शेख, राजेंद्र लांडगे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, नितीन बोराटे, मयूर भोकरे, सुहास जगताप यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×