खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – मैत्रिणीशी झालेल्या वादातून टोळक्याने तरुणीसह तिची आई, चुलतभावावर हल्ला केल्याची घटना खडकी परिसरारात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अनिकेत चांदणे, सागर चांदणे, आकाश चांदणे, यश गोपनारायण, सलमान शेख, नकुल गायकवाड, राहुल विघ्नेश्वर, कुबेर लखन, राज उर्फ बाब्या सोनार, अनिकेत पठारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खडकीतील हे महादेववाडीत राहायला आहेत. याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी चांदणे हे ओळखीचे आहेत. तरुणीचा आरोपीशी वाद झाला होता. त्यानंतर २९ जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास तरुणीच्या घरासमोर आले. त्यांनी तरुणीच्या घरासमोर दहशत माजविली. फिर्यादी यांची मुलगी, तिची आई आणि चुलतभावाला मारहाण केली. त्यांना बादलीने मारहाण केली. तरुणीच्या चुलतभावाच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले. सहायक पोलीस निरीक्षक पटेल तपास करत आहेत.



















