चैाघांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – मुंबई- बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर मोटारचालक तरुणाशी वाद घालण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका मोटार चालकाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चैाघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोटार चालक हे सांगली जिल्ह्यातील बागणी गावात राहायला आहेत. मोटार चालक तरुण आणि त्याचे काका हे ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्या वेळी बाह्यवळण मार्गावर वर्दळ होती. त्या वेळी एका वाहनातून आलेल्या चौघा चोरट्यांनी मोटार अडविली. ‘गाडी बाजूला का घेतली नाही ?’, असे सांगून वाद घालण्यास सुरुवात केली.
आरोपींनी मोटार चालक तरुणाशी वाद घालून त्याला मारहाण केली. आरोपींना तरुणाच्या काकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी मोटारीचे आरसे तोडले. खिडकीतून हात घालून आरोपींनी मोटार चालक तरुणाच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.





















