संगणक अभियंता महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – कौटुंबिक वादातून पतीचे नाव मुलीच्या जन्मदाखल्यावर येऊ नये म्हणून संगणक अभियंता महिलेने बनावट जन्मदाखला तयार करुन घेतला. बनावट जन्म दाखल्याच्या आधारे आधारकार्ड तयार केले. पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला. शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी एका संगणक अभियंता महिलेसह वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संगणक अभियंता पत्नीसह सासरे, तसेच नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीच्या कुटूंबियाची एटीएसकडून ५ तास चौकशी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याची पत्नी संगणक अभियंता आहेत. कौटुंबिक वादातून त्यांनी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मुलीच्या कागदपत्रावर वडिलांचे नाव लागू नये, यासाठी पत्नीने आठ वर्षीय मुलीचा बनावट जन्मदाखल तयार केला. हा दाखला खरा असल्याचे भासवून आधार कार्ड, तसेच अन्य कागदपत्रे तयार केली. या कागदत्रांच्या आधारे बँकेत खातेही उघडण्यात आले. पारपत्र मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. तिने शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक रायगोंडा तपास करत आहेत.



















