Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Metro Women Operated : पुणे मेट्रो देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Pune Metro Women Operated

मेट्रो मार्गिका-३ वर सुमारे १०० महिला ट्रेन पायलट करणार संचालन; पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा अधिक होणार

marathinews24.com

पुणे – Pune Metro Women Operated : सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असलेल्या पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची गरज लक्षात घेता आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो मार्गिका-३ ही देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) साकारलेली पहिली मेट्रो मार्गिका असून, सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. विशेष म्हणजे, ही मार्गिका देशातील पहिली १०० टक्के महिला संचालित मेट्रो ठरणार असून, सुमारे १०० महिला ट्रेन पायलट आणि स्थानकांवरील ५० टक्के महिला कर्मचारी या मार्गिकेचे संचालन करणार आहेत, हे अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे वाहतूक कोंडी कमी होणार- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ – सविस्तर बातमी 

सन २०१८ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेची पायाभरणी झाली होती. टप्पा-२ मधील चार विस्तारित मार्गिकांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, आज त्यांचे भूमिपूजन होत आहे. या ३१ किलोमीटर लांबीच्या आणि २८ स्थानकांच्या मार्गिकांसाठी केंद्र सरकारने सुमारे ९ हजार ८५८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. (Pune Metro Women Operated) या विस्तारामुळे वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, कोथरूड, बावधन, विमाननगर, खराडी आणि वाघोली हे भाग जोडले जाणार असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरपेक्षा अधिक होईल. या मार्गावरील आर. के. लक्ष्मण संग्रहालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही स्थानके अनुक्रमे ‘कॉमन मॅन’ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणारी ठरतील, असा उल्लेख त्यांनी केला.

पुणे मेट्रोच्या प्रत्येक सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) निर्मितीपासून मंजुरीपर्यंत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला, तसेच जुलै महिन्यात हिंजवडीतील मेट्रो स्थानकांची पाहणी करून कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या ४२६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, ही कामे प्रत्यक्षात पूर्ण होण्याकडे पालकमंत्री म्हणून स्वतः बारकाईने लक्ष देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×