पोलीस आयुक्तसाहेब आदेशाचे बक्षीस निलंबन का, दलात रंगली चर्चा
marathinews24.com
पुणे – न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत मध्यरात्री पावणेदोन वाजेनंतर बेशिस्त कॅफे सुरू असल्यामुळे रात्रपाळीच्या पोलीस उपनिरीक्षकाने धाव घेतली. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे टेबलावरील फक्त चार कपासह रिकाम्या प्लेट काठीने उडवल्या. मात्र, याची मोठी किंमत डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला चुकवावी लागली आहे. त्यांना थेट निलंबनाला सामोरे जावे लागले असून, संदीप कदम असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने रात्री-अपरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बेशिस्त आस्थापना बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. त्याची अमलबजावणी करण्यासाठी गेलेल्या उपनिरीक्षकाला एवढी कठोर शिक्षा का, अशी चर्चा दलात रंगली आहे.
बीडच्या तालखेड खून प्रकरणाचा १२ तासात लावला छडा – सविस्तर बातमी
उपनिरीक्षक संदीप कदम हे डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात नियुक्तीस असताना ६ जूनला ते रात्रपाळीत नियुक्तीला होते. त्यादिवशी मध्यरात्री पावणेदोन वाजेनंतर शिरोळे रस्त्यावरील फ्लाईंग जिप्सी हे कॅफे सुरू होते. त्याठिकाणी ग्राहकांना खाद्यपदार्थ, पेय, कॉफी सर्व्ह केली जात होते. गस्तीवेळी उपनिरीक्षक कदम यांना कॅफे सुरू असल्याचे दिसून आल्यामुळे ते आतमध्ये शिरले. कॅफेतील टेबलवर असलेले कॉफीचे चार कप, काही प्लेट काठीने पाडल्या. नियमांचे उल्लंघन का केले, अशी विचारणा कर्मचार्यांना केली. मात्र, याप्रकरणी घडले भलतेच, घटनेचा व्हिडिओ व्हायरल करीत संबंधिताने चाल खेळली. त्यामुळे अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी उपनिरीक्षक संदीप कदम यांच्या निलंबनाचे नुकतेच आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्तसाहेब आदेशाचे बक्षीस निलंबन का, दलात रंगली चर्चा
कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील पानटपर्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री १० वाजेपूर्वी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तर हॉटेल, बार, रेस्टॉरंट व्यावसायिकांना दीड वाजेपर्यंत आस्थापना बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित उपनिरीक्षकाने कॅफेवर केलेल्या कारवाईचे त्यांचे निलंबन बक्षीस आहे काय, उपनिरीक्षकावरील या कारवाईमुळे रात्री पावणेदोन वाजेनंतरही खाद्यपदार्थ सर्व्ह करणारा कॅफे व्यवस्थापन चुकीचे नसल्याचे वाटत आहे का, या कारवाईमुळे कर्मचारी-अधिकार्यांमध्ये नाराजी असून, यापुढेही आपल्या आदेशाचे पालन नेमके अधिकार्यांनी कसे करावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.























