Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पुण्यात पावसाने दुचाकीस्वारांची दैना, गाड्या घसरल्या

पुण्यात पावसाने दुचाकीस्वारांची दैना, गाड्या घसरल्या

वाहतूक कोंडींचाही अनेकांना फटका

marathinews24.com

पुणे – शहरात रविवारी (दि. २१) झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपट उडाल्याचे दिसून आले. पहिल्याच पावासामुळे रस्त्यावरील ऑईलमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडले. त्यामुळे काहीजणांना दुखापत झाली असून, स्थानिक नागरिकांसह वाहतूक पोलिसांनी संबंधितांना वाहने उचलण्यासह जखमींना मदत केली. त्यातच सुटीमुळे खरेदीसाठी मध्यवर्ती भागात जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांना पावसाचा फटका सहन करावा लागला. प्रामुख्याने मध्यवर्ती भागासह उपनगरात वाहतूक कोंडीतही भर पडली होती.

रिक्षाचालकाकडून प्रवासी तरुणाची लूट – सविस्तर बातमी 

पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागातही पाणी साचल्याचे दिसून आले. तर मध्यवर्ती बाजीराव रोड, रामटेकडी परिसरात दुचाकीस्वार घसरून पडले. दरम्यान, खरेदीसाठी मध्यवर्ती भागात प्रवास करता यावा, यासाठी काहीजणांनी मोटारीसह प्रवाशी वाहनांना प्राधान्य दिले. मात्र, वेळेत पोहचण्याचा कयास लावलेला अनेकांना कोंडीला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतूककोंडीत भर पडली होती. मात्र, पावसाच्या सरी वाढल्यामुळे दुचाकीस्वारांनी आडोसा शोधून जागीच थांबणे पसंत केले. त्यामुळे मोटार चालकांना रस्ता मोकळा झाल्यामुळे पुन्हा काही वेळाने वाहतूक सुरळित झाली होती.

पोलिसांची मदत, रूग्णवाहिका चालकही तत्पर

पहिल्याच पावसामुळे ऑईलचा फटका अनेक दुचाकीस्वारांना बसला. त्यामध्ये काही महिलांचाही समावेश असून, संबंधितांना किरकोळ स्वरूपात जखम झाली. मात्र, बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवांनी तत्काळ धाव घेत अपघात ग्रस्तांना मदत केली. रूग्णवाहिका चालकांनीही वेळेत बचाव कार्य राबवून जखमींना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, ऑईलमुळे रस्ते निसरडे झाल्यामुळे दुचाकीस्वारांनी जपून वाहने चालवावीत, वाहतूक नियमांचे पालन करावे, अपघातग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×