Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरहदचा पुढाकार

नेपाळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरहदचा पुढाकार

नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सरहदचे शिष्टमंडळ नेपाळमध्ये जाणार

marathinews24.com

पुणे – नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नेपाळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे.

दर्शनासोबत विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा अष्टविनायक दौरा संपन्न – सविस्तर बातमी 

नेपाळमधील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी तसेच आपत्तीमुळे नेमके किती आणि कोणत्या स्वरूपाचे नुकसान झाले आहे याचा अभ्यास करण्यासाठी सरहदचे एक शिष्टमंडळ लवकरच नेपाळच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये पूरग्रस्त भागांना भेट देऊन स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था, नागरिक आणि आपत्तीग्रस्तांशी संवाद साधण्यात येणार आहे.

या अभ्यासातून नेपाळमध्ये सध्या सर्वाधिक गरज कोणत्या क्षेत्रात आहे, कोणत्या स्वरूपाचे दीर्घकालीन व परिणामकारक काम करता येईल तसेच *मदतकार्याची दिशा आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केवळ तात्पुरती मदत न करता स्थानिक गरजांचा अभ्यास करून शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, मूलभूत सुविधा, बालकल्याण आणि उपजीविका पुनर्स्थापना यांसारख्या क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार काम करण्याची शक्यता सरहदकडून तपासली जाणार आहे.

या संदर्भात आयोजित बैठकीस संजीव शहा, दिलीपसिंह विश्वकर्मा, डॉ. शैलेश पगारिया, विवेक राऊत, संजय नहार, चंद्रकांत घाणेकर, राजेंद्र नवले, लेशपाल जवळगे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×