विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विमाननगर परिसरातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने ग्राहकाकडून मिळालेले मशीन इन्स्टॉलेशनचे पैसे आणि रोख रक्कम स्वतःच्या खात्यावर घेऊन साडेसात लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुकेश संतोष पाटील (वय २७ वर्षे, रा. रुक्मिणी बिल्डिंग, गणेश पीजी, बॉलीवूड टॉकीजसमोर, गणेश नगर, चंदननगर, पुणे, मूळ रा. सांगली) याच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितीश कुमार अखिलेंद्र कुमार ठाकूर (वय ३८ वर्षे, रा. डीमार्टच्या मागे, लोहगाव रोड, वाघोली, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
एचआयव्हीग्रस्त मुलांच्या निवाऱ्याच्या नावावर खंडणी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ जून रोजी सकाळी सव्वासहा वाजता फिर्यादी यांच्या कंपनीचे कर्मचारी सुकेश पाटील याने ग्राहक प्रशांत जाना यांनी दिलेली सहा लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम आणि कंपनीचे दुसरे ग्राहक शुभम पाटील यांच्याकडून मशीन इन्स्टॉलेशनचे बाकी राहिलेले एक लाख रुपये असे एकूण सात लाख ३० हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. ही रक्कम कंपनीत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करून तो पळून गेला.























