Breking News
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कारकृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधनवारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यातहल्ल्याची १० महिन्यांपुर्वी तयारी, ५ आरोपी अटकेतनागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यातसिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारसमाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावीचांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांनाआंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

कुख्यात आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याचा संशय

टिपू पठाण टोळीतील सराइत गजाआड

marathinews24.com

पुणे – आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याच्या संशयावरुन गुंड टिपू पठाण टोळीतील सराइतांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवार पेठ परिसरातून अटक केली. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याच्यासह आठ जणांविरुद्ध मंगळवारी (२ सप्टेंबर) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गणपती विसर्जन सोहळ्यासाठी पुण्यात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त – सविस्तर बातमी

आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याच्या संशयावरुन पोलिसांनी सोमवार पेठ परिसराून तालीम आस मोहंमद खान उर्फ आरिफ (वय. २४, रा. लोणी काळभोर) युनूस जलील खान (वय २४, रा. सय्यदनगर, हडपसर) यांना अटक करण्यात आली. दोघे टिपू पठाण टोळीतील सराइत आहेत. तालीम याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो मध्यप्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले आणून शहरातील सराइतांना विक्री करतो. तालीम याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतूसे पोलिसांनी जप्त केली आहेत. याबाबत पोलीस हवालदार अनिकेत बाबर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर, नीलेश जाधव, ओंकार कुभार, संभाजी सकटे, नीलेश साबळे, अमित जमदाडे यांनी ही कामगिरी केली.

वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि साथीदारांची घरे आंबेगाव पठार परिसरात आहेत. त्यांच्या घराची पाहणी करुन गायकवाड याच्या निकटवर्तीयांचा खून करण्याचा कट आंदेकर टोळीने रचला होता. आंदेकर टोळीतील अमन पठाण याच्यासोबत तालीम खान याचे मोबाइलवरुन संभाषण झाले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. आंदेकर टोळीतील सराइत दत्ता काळे हा कृष्णा आंदेकर याच्या संपर्कात होता. आंदेकर याने काळे याला पाच हजार रुपये खोली भाड्याने घेण्यासाठी दिले होते. काळे याने कृष्णाला वनराज आंदेकर याच्या खून करणाऱ्या आरोपींच्या घराची माहिती दिली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×