स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलीस छाप्यात कारवाई स्पा सेंटरच्या नावाखाली तरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा प्रकार वारंवार घडत असल्याचे दिसून आले आहे. विमानतळ परिसरात अशाचप्रकारे स्पा सेंटरमध्ये अल्पवयीन मुलींना स्पाच्या कामाकरता ठेवून त्यांना जास्त पैशाचे आमिष दाखवून स्पा मालक व मॅनेजर यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर अचानक छापा टाकून तीन अल्पवयीन मुलींसह चार जणींची सुटका केली असून स्पा मालक व मॅनेजर यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे . त्यानुसार किरण आडे उर्फ अनुराधा बाबुराव आडे (वय _२८, राहणार_ खराडी, पुणे )असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सदर कारवाईमध्ये १९ वर्षाची एक तरुणी, १५ वर्षाच्या तीन मुली यांची कारवाई दरम्यान वेश्याव्यवसाय मधून सुटका केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात सदर स्पा सेंटर चालवण्यात येत होते. स्पा मध्ये ग्राहकांची मसाज करण्यासाठी विविध मुलींना कामास ठेवून त्यांना जास्त पैशांचे आमिष स्पा मालक आणि मॅनेजर यांनी दाखवले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत स्पा सेंटरच्या नावाखाली आरोपींनी मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले आहे .याबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस बालपांडे करत आहे.
गुन्हेगारी

खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय

मसाज पार्लरच्या मालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. […]