Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

टीईटी पेपर फुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल

टीईटी पेपर फुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल

राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली ‘शिक्षण पात्रता परीक्षा’ (TET) २०२६ पेपरफुटीची घटना घडल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ – सविस्तर बातमी 

शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, भिवंडी येथे काही संशयितांकडे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका असल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी धाड टाकून संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली. यात जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न हे उद्या होणाऱ्या प्रत्यक्ष परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी समान असल्याचे आढळून आले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणीची आवश्यकता नाही

विद्यार्थ्यांचे हित आणि परीक्षेची पारदर्शकता जपण्यासाठी २८ जून रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले.

मंत्री भुसे म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह शालेय शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून पोलीस प्रशासनाला सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×